Categories
Fellowship JSW Foundation Fellowship

 “प्रवास”

                  

विदर्भातून कोंकण पर्यंतचा हा प्रवास मला खूप काही शिकवून गेला. माझी निवड हि jsw foundation fellowship मध्ये झाली ,आणि मी माझी १५ दिवसाची training पूर्ण केली .मला मिळालेल्या लोकेशन म्हणजेच vasind पालघर ला गेली.

                 आता दोन मुलांन बरोबर मी एकटी होती, 

दोन च दिवसात मला काही कळेनास झालं आपण कूठे आलो आहे ,काय करायचं आहे ,काहीच सुचत नव्हत आणि काही दिवसानंतर मला माहीत झालं कि माझ लोकेशन चेंज झाल आणि मला रत्नागिरी मिळाली.

              मी फक्त मोबाईल आणि फोटो मध्येच रत्नागिरी बद्दल ऐकल होत आणि मला अश्या सुंदर ठिकाणी जायला मिळणार आहे याचं आनंद मला फार होता. आणि म्हणूनच मी माझ्या पॅकिंग ला जोरा शोराने लागली. 

माझी ट्रेन ठाणे वरून ७ वाजून ४५ मिनिटाला होती मी आता  सकाळी निघाली खूप शोधलं काही मिळालं नाही वाट बघून बघून एक ऑटो वाले दादा आले आणि त्यांनी मला सोडून दिलं vasind स्टेशन ला जिथे मी ट्रेन ची तिकीट काढली आणि , ट्रेन ची वाट बघत होती थोड्याच वेळात लोकल ट्रेन आली आणि मी त्यात बसली पहिला माझ्या आयुष्याचा तो लोकल चा प्रवास होता ट्रेन तर आधी खाली होती पण त्या नंतर मात्र गर्दी वाढत गेली.                                                   

आणि मी त्या ट्रेन मध्ये बघितल काही बाया train मध्येच हळदी कुंकू लावत होत्या तर काही बाया उखाणे म्हणत होत्या तर काही मला विचारत होत्या की तु कूठे जात आहे आणि मी जिथे जात आहे , त्यांना त्याच्या सामोरं जायचं असेल तर ते मला म्हणत होत्या हे सीट माझी म्हणजे कोणी मला विचारलं नाही की मी बसू शकते का Direct ते म्हणाल्या ती सीट म्हाजी, आणि मग असं मी पहिल्यांदाच बघितल होत काही वेळा नंतर गर्दी खूप जास्त झाली आणि दरवाजा दिसेनासा झाला माझ्या जवळ माझ्या तीन मोठ्या बॅग होत्या आणि ऐकटी मी होती ते भांडण धक्काधुक बघून मला खूप भीती वाटत होती मला माहित झाल की स्टेशन वर गाडी जास्त थांबत नाही इथे लोकच उतरू शकत नाही तर मी तीन बॅग घेऊन कसं उतरू ? हे माझ्या पुढे प्रश्नच होता मी खूप आग्रह केला please मला समोर जाऊ द्या माझी train ४ मिनिट मध्ये येणार आहे परंतु गर्दी खूप होती आणि त्या गर्दी मध्ये बाया खूप भांडत होत्या मला जाऊ नाही देत होत्या , माझे केस खीचले मला खूप नख पण रुतले पण मी त्यांना मागे करतं कशी तरी दाराजवळ जवळ आली आणि त्या दोन ताई ला सांगितलं please माझ्या बॅग बाहेर फेका मी खाली उतरेल आणि त्यांनी माझ्या बॅग खाली फेकल्या पण मी खाली उतरताना पडली  तरी मी धाडस दाखवून खाली उतरली मी फक्त reels मध्येच आज पर्यंत बघितल की लोकल मध्ये अशी गर्दी असते भांडण होतात आज मी प्रत्यक्ष त्याला अनुभवल. माझ्यात शक्ती न्हवती तरीही मी त्या तीन बॅग पकडून माझ्या ट्रेन मध्ये चढली आणि तिथून सुरू झाला माझा ह्या fellowship मधला आणखी एक नवीन प्रवास ज्यात मी एका बाहेर देशाच्या दादाला ट्रेन च्या gate जवळ बघितल आणि नेमक तेवढ्यातच तिथे पैसे मागणारे लोक आले आणि त्यांना  त्रास देऊ लागले त्यांनी मराठी मध्ये बोलत होते आणि तो दादा इंग्लिश मध्ये म्हणत होता,  i don’t understand,  i don’t understand, मग मी तिथे गेली आणि त्यांना समजावलं ते आपल्या देशाचे पाहुणे आहे , 

आणि त्यांना पैसे नका मांगु तेव्हा ते लोकं तिथून गेलीत आणि नंतर त्या  दादाने मला एक प्रश्न विचारला की यांनी कोण आहे मला पैसे का बर मांगत होते दिसायला तर छान होते छान कपडे लावले होते तरीही ते पैसे का बर मांगतात ? मी त्या दादा कडे  बघू लागली प्रश्नाचं उत्तर माझ्याही कडे न्हवत मग त्या दादाने मला विचारलं तुला इतकं bleeding का बर जात आहे आणि त्या दादाने मला डेटॉल लाऊन दिलं माझी मदत केली आणि तेव्हा मला समजल की माणुसकी माणसात असते आज मी त्याला मदत केली तर मला जेव्हां मदतीची गरज होती तो माझ्या मदतीला आला म्हणून आपल्या साठी कुणाला मदत करण हे जरी छोटीशी गोष्ट असेल पण दुसऱ्यांसाठी ती फार मोठी मदत होऊ शकते आणि असा हा माझा ratnagiri पर्यंतचा प्रवासाने मला रिअल situation शी डील कसे करायचे आणि सामोरं कसे वाढायचे हे शिकवले. परिश्रम केल्यावर फळ नक्कीच मिळेल आणि मलाही फळ स्वरूपात ratnagiri सारख्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे. 

2 replies on “ “प्रवास””

First solo travel experiences are unforgettable – new places, new people, new language, new cultures, and diverse experiences. This is how we grow. A beautifully written experience by Rutuja.

Liked by 1 person

Leave a reply to Lokesh Umak Cancel reply