Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

ALL THE BEST

मुलं १० वी मध्ये गेलं की घरातलं वातावरण बदलत, जणू काही तो मोठी लढाई लढायला जाणार आहे असं वाटायला लागतं. आई वडील ठरवतात की या वर्षी आपला टीव्ही बंद ठेवायचा, केबल काढून टाकायची, बाहेर कुठे ही सहलीला जायचं नाही, मुलापासून मोबाइल लांब ठेवायचा, घरात जास्त नातेवाईक बोलवायचे नाही आणि बरच काही. इतकी सगळी तयारी बघून आजूबाजूच्या सगळ्यांना कळतं की यांचं मुलं यंदा १० वीत गेलं आहे आणि ही बातमी बोलता बोलता पूर्ण मोहल्ल्या मध्ये पसरते. हे सगळं बघून “मला तारे जमीन पर” या चित्रपटातलं “जमे राहो” हे गाणं आठवतं.

१० वी ची परीक्षा मुलाच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा असतो. पुढच्या वर्षी आपण कोणती साईड निवडावी आणि कोणतं शिक्षण घ्यावं हे त्याला ठरवायचं असतं. इतकचं नव्हे तर १० वी नंतर तो एका नवीन जगामध्ये प्रवेश करणार असतो. त्याची १० वी चांगली जावी म्हणून घरातले सगळी तयारी करतात, त्याला चांगल्या क्लासला घालतात, तसच सगळ्या सोयी उपलब्ध करून देतात. आई वडील आणि नातेवाईकांना त्याचाकडून खूप अपेक्षा असतात. शाळेत सुद्धा खूप मेहनत घेतली जाते कारण शाळेला ही त्यांची मुलं १०० टक्के पास झाली पाहिजे आणि ते ही चांगल्या मार्कणे अशी इच्छा असते. हे सगळं चित्र तुम्हाला शहरात जास्त दिसेल.

ग्रामीण भागात मात्र असं चित्र फार कमी दिसतं. मुलं १० वी ला असलं तरी त्याची रोज ची काम ठरलेली आहेत. शाळा संपल्यावर शेतात जाणं, जनावरांना पाणी देणं, घरातलं आवरणं आणि मग वेळ मिळाला की अभ्यास करणं. गावात फार कोणाला माहित नसत की कुणाचं मुलं १० वीत आहे आणि माहित असलं तरी इतकी काही चर्चा होत नाही.

शहरात बोर्डाच्या परीक्षेच्या आधी नातेवाईक, आजूबाजूचे त्याला शुभेच्छा द्यायाला येतात, कोण खाऊ घेऊन येतं तर कोण पेन. आणि हे सगळं अनुभवून त्या मुलाचं मन भारावून जातं. शाळेतून सेंडॉफ ही मिळालेला असतो. आता फक्त त्याला परीक्षा द्याची बाकी असते.

हे सगळ मी बघितलं आणि गावात असं काही होत नाही समजल्यावर माझ्या मनात कुठे तरी ते होतं की गावातील मुलांसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे जेणे करून त्यांना ही वाटेल की आपलं गाव आपल्या सोबत आहे, आपल्या पाठीशी आहे.

म्हणून आम्ही ठरवलं की २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस” ग्राम पंचायत मध्ये साजरा करायचं. JSW फाऊंडेशन फेलोशिप प्रोग्राम आणि ग्राम पंचायत लिंगा यांनी एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले.

गावातील १० वी च्या मुलांना त्या दिवशी ग्राम पंचायत मध्ये बोलावण्यात आले होते. तसच त्यांचे पालक, गावातील सर्व नागरिक आणि ग्राम पंचायत चे सर्व पदाधिकारी हे ही हजर होते. मुलांना माहित नव्हतं की त्यांना तिथे का बोलावलं होतं. सुर्वातिला डॉ. अब्दुल कलाम यांच्या फोटोचे पूजन केले. मग प्रेरणादायी  गाणी गाऊन मुलांचं मनोबल वाढवलं. ग्राम पंचायतच्या सर्व पदाधिकार्यानी, तसच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षणी देखील त्यांना मार्गदर्शन केले आणि १० वी ची परीक्षा किती महत्त्वाची आहे हे ही सांगितले, त्यांचे १० वी चे किस्से सांगितले आणि गाव कायम तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा ग्राम पंचायत उपलब्ध करून देईल हे ही त्यांना आश्वासन दिले.

पालकांनी ही मुलांना शुभेच्छा दिल्या. गावातील अशा वर्कर यांनी मुलांना परीक्षेचे ३० दिवस किती महत्त्वाचे आहे आणि तुम्ही आपल्या आरोग्याची कशी काळज घेतली पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय प्यायला पाहिजे तसच परीक्षेचा ताण न घेता, आराम सुद्धा महाताचा आहे हे ही सांगण्यात आले.

मुलांसाठी हा नवीन अनुभव होता कारण ते पहिल्यांदा ग्राम पंचायत मध्ये आलेले. त्यांचे मन भारावून गेले होते. त्यातील काही विद्यार्थी पुढे येऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता त्यांच्यासाठी केक कापून केली आणि त्यांना खाऊ देण्यात आला.

ग्राम पंचायत ने उचलेलं हे एक छोटसं पाऊल होतं कारण शाळेतली मुलं उद्याची तरुण पिढी आहे आणि पुढे जाऊन आपल्या देशाला घडवणारे जबाबदार नागरिक. त्यांना योग्य दिशा दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे हे समजून ग्राम पंचायत ने पुढाकार घेतला. उद्या जाऊन मुलांना आपल्या गवाविषयी प्रेम असाव आणि गावाच्या विकासासाठी त्यांचा मोलाचा वाटा असावा तसच त्यांना काहीही अडचण असली तर ग्राम पंचायत तुमच्यासाठी कायम उगढी आहे हा संदेश ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.

One reply on “ALL THE BEST”

Leave a comment