Categories
Corporate Social Responsibility

A ray of hope in a world of uncertainty

अनिश्चित जगात आशेचा किरण

Lao Tzu म्हणाले आहेत की, “The journey of thousand miles begins with one step.”

२०० दिवस झाले आहेत JSW Foundation Fellow प्रोग्रमला जॉईन करून. आज सुद्धा मला तो पहिला दिवस आठवतो जेव्हा मी ज्या गावात काम करणार होतो तिथे गेलेलो आणि ते गावं म्हणजे लिंगा जे कळमेश्वर तालुका आणि नागपुर जिल्ह्यात येतं. आपण जसं एका सिनेमा मध्ये गावं बघतो तसच होतं माझं गाव. हळु अणि आपल्या वेगाने चालत होतं. आता त्यात नवीन असं होतं की माझा त्या गावात प्रवेश झाला होता.

माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं अणि सुरवात कुठून करू हे माहीत नव्हतं. पहिलं पाऊल होतं की लोकांशी संपर्क करणे अणि ते सुरू केलं. एक एक करत लोकांना भेट द्यायला लागलो. सुरवातीला भिती वाटायची की लोकं आपल्याला उभ करतील का, आपल्याशी बोलतील का ? पण ही भिती माघे ठेवून मी गावातल्या लोकांशी संपर्क करायला लागलो. त्याला आपण म्हणू पॉइंट ऑफ काँटॅक्ट. गावात फिरत असताना लोक माझ्याकडे बघायची की हा कोण आलाय गावात अणि इथे तिथे का फिरतोय. त्यांना वाटायचं की कोणतरी सरकारी अधिकारी आहे जो सर्व्हे करायला आला आहे. असं करत करत मी सगळ्यांशी भेटलो. पण आता पुढे काय? हा प्रश्न माझा डोक्यात कायम यायचा.

म्हणून मग असच गावात फिरायचो अणि जो मिळेल त्याचाशी गप्पा मारायचो. हळु हळु ही ओळख वाढु लागली अणि लोकांना कळायला लागला की मी सरकारी नोकर नसुन JSW मधला आहे आणि तिथून येतो. आता कशासाठी येतो हे अजून कोणाला ठाऊक नव्हतं. कधी झिल्ला परिषदच्या शाळेत जायचो तर कधी आंगणवाडीत.

अणि मग माझी ओळख झाली गावच्या सी आर पी अणि आशा वर्कर सौ संगिता ताई सोबत. त्यांना मी गावात का आलोय हे सांगितलं अणि त्या पहिल्या व्यक्ती होत्या ज्यांना ते समजलं. मग दर दिवशी त्यांना भेटायचो अणि त्यांचं काम समजून घ्यायचो. संगिता ताई गावच्या सी आर पी असल्याने तत्यांचं थेट काम महिला बचत गटांनसोबत . अणि मग त्या मला एक एक बचत गटाशी भेटायला घेऊन जायच्या.

आधी जसं म्हटलं की गावात फिरत असताना सगळ्यांना भेटलो पण लोकांना मी कोण आहे इतकं माहीत नव्हतं पण आता बचत गटाच्या महिलांना परत भेटल्यावर त्यांना सुद्धा मी या गावात का आलोय हते पटलं. अणि असं करत करत ही ओळख अजून वाढू लागली.

पण तुम्हाला माहीत असेल की विश्वास हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा अर्थ फार मोठा आहे. आता गावातली लोक माझावर का विश्वास ठेवतील? म्हणुन माझा हेतु काय आहे ते मी आधी सुद्धा अणि आता सुद्धा स्पष्ट करतो. त्यामुळे हा जो विश्वास आहे तो लोकांचा माझावर हळु हळु होत गेला अणि अजुन तो प्रवास चालू आहे. आणि आज जेव्हा मी गावात जातो तेव्हा लोक मला कोणी दादा म्हणुन हाक मरतात तर कोणी नाव घेऊन. कधी मी नाही गेलो तर ते फोन करून विचारतात की येणार आहात का तुम्ही?

सुरवातीला मी कोण होतो ह्याची भिती दुर झाली आणि आज एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोचली आहे. ती काय आहे ते नक्की पुढच्या वेळी संगिन. पण एक गोष्ट नक्की सांगू शकतो की हा प्रवास पहिल्या दिवसापासून ते आज पर्यंतचा अविस्मरणीय आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s