मी माझ्या एक वर्षाच्या फेलोशिप प्रवासाबद्दल सांगणार आहे, जो माझ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि बदल घडवणारा अनुभव ठरला. या प्रवासातील प्रत्येक टाप्याने मला नवीन गोष्ट शिकवल्या, आणि माझ्या विचारसरणीला विस्तार दिला आणि आयुष्याकडे पाहण्याचा दुष्टिकोन बडलवला. फेलोशीप च्या सुरुवातीला मला अनेक शंका होत्या. माझे ग्रॅज्युएशन पूर्ण पूर्ण झाले होते, पण मला सामोर काय करायला पाहिजे हे स्पष्ट नव्हते . मला माहित होते की समाजासाठी काहीतरी योगदान द्यायचे आहे, पण त्याचा योग्य मार्ग मला सापडत नव्हता. त्याचवेळी मला फेलोशिप बद्दल महिती मिळाली.





फेलोशिप म्हणजे एक असा कार्यक्रम होता ज्यात समाजसेवेच्या माध्यमातून व्यक्तिमत्वविकास केला जातो . माझे ध्येय आणि फेलोशिप चे उदिष्ट यामध्ये एक प्रकारची सुसंगतता जाणवली, त्यामुळे मी फेलोशिपसाठी अर्ज केला. अर्ज प्रक्रिया अत्यंत कठीण होती. मला माझ्या विचारशक्तीचा आणि क्षमतांचा पुरेपूर वापर करुन विविध प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. मला समाजात बदल घडवण्याची माझी भूमिका आणि त्यासाठी असलेल्या योजनांबद्दल स्पष्टता आवश्यक होती. या सगळ्या प्रक्रियेनंतर माझी फेलोशिप साठी निवड झाली आणि माझा प्रवास सुरू झाला. फेलोशिप च्या पहिल्या महिन्यात मी एका ग्रामीण भागात नियुक्त झाली. तिथले जीवन पूर्णपणे वेगळे होते. शहरातील सोयीसुविधा इथे नव्हत्या, गाडी सुध्दा खूप वेळानंतर मिळायची. त्यामुळे पहिल्या काही आठवड्यात मला खूप संघर्ष करावा लागला. परंतु, याच काळात मला लोकांशी संवाद साधण्याचे महत्त्व समजले तिथल्या लोकांनी मला आपलेसे केले, आणि त्यांच्या गरजा, समास्या, आणि आकांशा समजून घेण्याची संधी मला मिळाली. मी विद्यार्थी, आणि महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजुन घेतल्या आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. माझ्या कामाचा मुख्य फोकस महिला सक्षमीकरणावर होता . मला या शेत्रात काम करताना अनेक आव्हाने आली. ग्रामीण भागात अजूनही महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता कमी होती, नकळतपणे महिलांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे मी महिलांच्या गटाशी आणि शाळेतील मुलींशी चर्चा करून त्यांना सुरक्षेबाबत चे महत्त्व पटवून दिले . अनेक वेळा महिलांना आणि मुलींना सुरक्षे बाबतीत प्रवृत्त करणे कठीण होते, परंतु हळूहळू त्यांच्यात बदल होताना दिसला . या फेलोशिप मध्ये मला अनेक वेळा अपयश आले . काही वेळा मी केलेल्या योजना आणि प्रयत्नांमध्ये अपेक्षित परिणाम मिळाले नाही . परंतु या अपयशांनी मला आणखी मजबूत केले . मी प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकले , आणि पुढच्या प्रयत्नांमध्ये ते लागू केले . या प्रक्रियेत माझी समस्या सोडवण्याची शमता वाढली आणि धीराने निर्णय घेण्याची सवय लागली . फेलोशिप मध्ये एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अडोल्सन मुलींसोबत काम करणे . तिथल्या शाळांमध्ये मुलींसाठी वेगवेगळे activities तसचे मुख्य त्यांना सेल्फ डिफेन्स स्किल शिकवणे . सुरुवातीला मुली थोड्या घाबरायच्या लाजायच्या मागे दळायच्या परंतु, माझ्या सततच्या प्रयत्नांनी आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या वेळामुळे आमची जवळीक वाढली. या activities मुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्या बोलण्यातही सकरमत्क बदल दिसून आला . या फेलोशिप मध्ये मला वेळोवेळी विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी होता .आले यातून मला नवीन कौशल्ये शिकायला मिळाली . नेतृत्व शामता ,संघटन कौशल्य, वेळ व्यवस्थापन आणि संवाद कौशल्य शिकायला मिळाली . यामुळे मला केवळ कामातच नव्हे तर व्यक्तिगत आयुष्यातही मदत झाली .
