Categories
Fellowship

“नका सांगू फक्त मुलींनाच “

जितकं महत्त्वाचं मुलींना सशक्त करणं आहे.

त्यापेक्षा अधिक मुलांना संवेदनशील करणं आहे.

नका सांगू फक्त मुलींनाच की कसं सुरक्षित जगायचं.

शिकवा मुलाला पण की एखाद्या मुलीशी कसं नीट वागायचं.

नका सांगू फक्त मुलींना की कसं धोका दिसल्यास लढायचं.

सांगा मुलालाही की स्त्रीवर अत्याचार करण्याच्या विचाराला ही मस्तकात नाही येऊ द्यायचा . 

नका सांगू फक्त मुलींनाच की वाईट प्रवृत्तीच्या पुरुषांपासून कसं लपायचं .

पण शिकवा मुलालाही की एक चांगला व्यक्ती कसं व्हायचं. 

नका सांगू फक्त मुलींना की घराबाहेर पडणं किती धोक्याचं आहे. 

पण शिकवा मुलांनाही की नजर आणि विचारांना स्वच्छ कस  ठेवायचा आहे. 

नका सांगू फक्त मुलींना की आयुष्यभर तुला तुझी इज्जत जपायची आहे. 

पण शिकवा मुलांनाही की तुला प्रत्येक स्त्री  चा  आदर करायचा आहे. 

नका सांगू फक्त मुलींना की बाहेरचा जग तुझ्यासाठी किती वाईट आहे. 

पण शिकवा मुलाला ही की त्याच्या चांगल्या चरित्राने हे जग त्याला सुंदर करायचा आहे . 

मुलींचे रक्षण तर करायचेच आहे.

पण मुलांनाही सोबत मुलींन बाबतचे योग्य शिक्षण गरजेचे आहे.

तेव्हाच खऱ्या अर्थाने एक मुलगी सशक्त होईल , 

जेव्हा एक पुरुष तिची साथ  देईल . 

One reply on ““नका सांगू फक्त मुलींनाच “”

Leave a comment