गेले दीड वर्ष मी जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलो म्हणून ग्रामीण भागात काम करत आहे. माझा विषय ग्रामपंचायत सबलीकरण आणि महिला सशक्तीकरण आहे. मी कळमेश्वर तालुक्यातील लिंगा ग्रामपंचायत सोबत काम करत आहे. सुरुवातीला काम करत असताना आदर्श गाव म्हणजे काय याची कल्पना मला नव्हती. आमच्या सरांनी आदर्श गाव म्हणजे काय याचा परिचय करून दिला आणि त्याबद्दल माहिती दिली, आणि हा विषय अजून समजण्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रातले आदर्श गाव बघायला निघाले. मी हिवरे बाजार राळेगाव सिद्धी, पाटोदा, मान्याचिवाडी हे गांव बघितले. तेव्हा मला आदर्श गांव म्हणजे नाकी काय असतं हे कळाल.
आम्ही स्वप्न पाहिलं की आमच लिंगा गाव हे आदर्श गाव कसे बनू शकते आणि जेव्हा आम्ही स्वच्छते वर काम करायचं ठरवलं तेव्हा आम्ही सगळ्यांनी संकल्प केला की लिंगा गाव हे नागपूर जिल्ह्यात स्वच्छतेमध्ये आदर्श गाव झालं पाहिजे. आम्ही जेव्हा बचत गटाच्या मीटिंग घ्यायचो तेव्हा त्यांना आदर्श गाव ही संकल्पना सांगायचो आणि मी पाहून आलेले आदर्श गावाचे फोटो आणि व्हिडिओ दाखवायचो आणि त्यांना सांगायचो की एके दिवशी आपलंही गाव ही आदर्श झालं पाहिजे. हा विषय मी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर ही मांडला. आम्ही अनेक उपक्रम राबवले जसे ग्राम स्वच्छता अभियान, कचऱ्याची विल्हेवाट लावणं, कचरा गोळाकरून काचऱ्या डब्यात जाऊन टाकणे. यात ग्राम पंचायत नी सुद्धा पुढाकार घेतला आणि कचऱ्याचे डबे लावले, प्लॅस्टिक जमा करण्यासाठी वेगळे कठगहरे लावले आणि आम्ही सर्व जण एकत्र स्वच्छतेच्या मार्गावर चालू लागलो.
हे सगळं होत असताना आमच्या गावातील नागरिकांना आदर्श गाव म्हणजे काय हे बघण्याची उत्सुकता होती. म्हणून आम्ही ठरवलं की विदर्भातील एक आदर्श गावाचा अभ्यास दौरा करायचा. त्यात अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सावंगा हे गाव आम्ही निवडले. सावंगा गाव हे स्मार्ट ग्राम म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक योजना राबवल्या आहेत आणि त्यासाठी त्यांना बक्षीसही मिळालेली आहेत. आता पुढचा प्रश्न होता की या अभ्यास दौऱ्यामध्ये कुणाला घेऊन जायचे. आमच्या डोक्यात असं होतं की गावातील सर्व महत्वाचे घटक यात असले पाहिजे त्यात ग्राम पंचायतची पूर्ण बॉडी, बचत गटातील महिला, तरुण वर्ग, शाळेचे मुख्याध्यापक, गावातील समाजसेवक आणि महत्वाची लोक जी गावाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील असतात. ह्यां सर्वांचा आम्ही त्यात समावेश केला. ह्या सगळ्यांची लिस्ट तयार करण्यात आली आणि 14 मे 2024 की तारीख ठरवण्यात आली.

आता लिंगा गावातील लोकांना ही उत्सुकता होती की आम्ही आदर्श गाव बघायला जात आहोत कारण आपण फिरायला पर्यटन स्थळी जातो, देव धर्मासाठी आपण मंदिर बघायला जातो पण एका गावातील लोक दुसरं गाव बघायला जात आहोत असं कधीच झालं नव्हतं. आम्ही लक्झरी बस केलेली आणि सकाळी दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही सावंगा गावाला पोहोचलो. तिथे आमच स्वागत गावच्या सरपंच माया सोनागोती आणि ग्रामपंचायत चे डेटा ऑपरेटर मिलिंद आंडे यांनी केले. आम्ही सर्वांनी नाश्ता करून घेतला आणि पुढच्या सत्रासाठी तयार होतो. मिलिंद आंदे यांनी आम्हाला आख्या दिवसाचे नियोजन सांगितलं आणि आम्ही गाव बघायला निघालो.
सावंगा ग्राम पंचायत ने मोठ्या संख्येवर वृक्ष लागवड केली आहे. त्यांनी एकूण २४ हजार झाडं लावली आहे. त्यांनी नर्सरी सुद्धा बनवली आहे जिथून ते गावातील नागरिकांसाठी कमी दरात झाडं उपलब्ध करून देतात. इतकचं नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे गवत ही उगवले जाते. झाडांचा पुरेपूर अभ्यास करून हा मोठा उपक्रम राबवला आहे आणि आज त्याचमुळे त्यांच्या ग्राम पंचायत ला आर्थिक दृष्ट्या फायदा ही मिळत आहे.

जल संधरणाची काम आणि पाणी वाचवा आणि पाणी जिरवा ह्यावर ही त्यांनी मोठं पाऊल उचललं आहे आणि पाणी फाउंडेशन या संस्थेच्या वॉटर कप या स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिक जिंकले आहेत. गावात ठीक ठिकाणी कॅमेरे, स्पीकर बसवण्यात आलेले आहे, जेणेकरून गावात काहीही घडलं तर ते कॅमेरा द्वारे बघण्यात येते आणि कोणती ही माहिती स्पीकर द्वारे सांगण्यात येते.
सावंगा गावाने स्वच्छतेवर अप्रतिम काम केले आहेत. प्रत्येक घराला दोन कचऱ्याचे डबे दिले आहे ज्यात ओला आणि सुख कचरा वेगळं केलं जातो, गावात दर रोज काचऱ्याची गाडी फिरते आणि कचरा गोळा करते, मग तो कचरा, कचरा देपोत नेहून त्याची विल्हेवाट लावण्यात येते आणि ओला कचऱ्याचे खात तयार करून पुन्हा लावलेल्या झाडांसाठी वापरण्यात येते. ह्या सगळ्या कामा मुळे त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत. हे सगळं बघून झाल्यावर आम्ही सर्व जण त्यांच्या ग्राम पंचायत मध्ये बसून सखोल चर्चा केली आणि राबवलेल्या योजनांची माहिती घेतली.
दुपारी संगळ्यांच जेवण झाल्यानंतर लिंगा गावातील सर्व आलेल्या घटकांची चर्चा झाली की यातल्या कोणत्या गोष्टी आपल्या गावात होऊ शकतात आणि खास करून स्वच्छते संबंधी आपण कोणत्या योजना कश्या राबवू शकतो आणि आपले गांव आदर्श करू शकतो.

चर्चा पार पाडल्या नंतर आम्ही सावंगा ग्राम पंचायत च्या सरपंच आणि पूर्ण बॉडी चे आभार मानले की त्यांनी आपला वेळ काढून आम्हाला त्यांचे गांव दाखवल्याबद्दल. आणि आम्ही पाहिलेलं आदर्श गावाचं स्वप्न प्रत्यक्षात बघून परत लिंगा ला यायला निघालो. हा अभ्यास दौरा लिंगा गावातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल लिंगा ग्राम पंचायत लोकसहभागातून गावाचा विकास करतील आणि गावातील मंडळिणी पाहिलेलं स्वच्छते मधलं आदर्श गावाचं स्वप्न पूर्ण करतील ह्याची खात्री आहे.
