
राजू ला मुलगी झाली हे कळताच त्याचे बाबा सगळ्यांना सांगत सुटले. अहो सुधीर भाऊ, राजू ला मुलगी झाली, तीन पौंडाची आणि गोरी गोरी पान, अगदी राजू वर गेली आहे. ही गोड बातमी संध्याकाळ पर्यंत पूर्ण सोसायटी मध्ये पसरलेली. जणूकाही उद्या वृत्तपत्रात येईल असं वाटतं होतं पण ते काही झालं नाही. किती आनंदाचा क्षण आहे ना जिथे मुलगी जन्माला आली तर उत्सव साजरा केला जातो आणि समाजात दुसऱ्या बाजूला ज्या परिवाराला मुलगी नको असते, ती लोक मुलगी जन्माला नं येण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. असो, एक नाण्याची दोन बाजू.
मुलगी जन्माला आली की लहानपणा पासून तु मुलगी आहेस हे किती वेळा तिला दर्शवल जातं मग तिला वेगळी खेळणी असो किंवा मुलांपासून लांब राहणं, रात्री लवकर घरी यायचा हा, रात्री बाहेर फिरायला जायचं नाही किंवा तु हे कपडे घालू शकत नाहीस अश्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. ती मात्र शांत पणे ऐकून घेत असते. शिक्षणात सुद्धा मुलाला जास्त किम्मत आहे आणि मुलीला तितकं शिकायला पण मिळत नाही आणि एकदा अठरा ची झाली की लग्न लावून दिलं जातं. तिच्या खऱ्या आयुष्याची सूर्वात होण्याआधीच तिला दुसऱ्यांच्या घरी पाठवल जातं. आता नवीन घरात तिला आपलं आयुष्य घालवायच आहे हे समजून ती आपल्या संसाराची सुर्वात करते. त्या घरात सगळ्यांना समजून स्वतःची ओळख निर्माण करायचा प्रयत्न करते. जबाबदाऱ्या वाढायला लागतात आणि मग तिला वाटायला लागतं की हेच आपला आयुष्य आहे आणि त्यात ती आनंद शोडते. मग तिचं अस्तित्व काय? जन्माला आल्या पासून ते लग्न होई पर्यंत तिची ओळख कधीच निर्माण झाली नाही. हे सगळं मी गेल्या अठरा महिन्यांमध्ये जवळून पहिलं, महिलांच्या तोंडून ऐकलं आणि ग्रामीण भागात महिलेच स्तान कसं ठरवलं जाता हे ह्याचा ही शोध घेतला.
मी लिंगा गावात काम करताना महिला सक्षमीकरण या विषयावर ही जोर दिला. त्याची सुर्वात बचत गटापासून झाली. महिलांच संगठन करण्या करिता आम्ही बरेच कार्यक्रम राबवले आणि ते यशस्वी ही झाली. पण महिलेची ओळख मात्र कुठे तरी दडलेली होती. ती घर काम करायची, शेतात जायची, कोण अशा वर्कर होती तर कोण अंगणवाडी सेविका, इतका सगळं करून ती बचत गटात ही यायची आणि आपली मुख्य भूमिका पार पडायची. महिला ग्राम पंचायत ची सदस्य किवा सरपंच असली तरी पाच वर्षानंतर तिचा कार्यकाळ संपतो, शेतात जात असेल तर कदाचित बंद ही होऊ शकतं, पण ती बचत गटाची सदस्य झाली की कायम स्वरुपी सदस्य किंवा सचिव म्हणून ओळखली जाते.
इतकं सगळं बघितल्यावर आम्ही ठरवलं तिच्या नावाच्या पाट्या तयार करायच्या. लिंगा मध्ये २१ बचत गट आहे. या बचत गटाचा संस्कृती ग्राम संघ आहे. एके दिवशी आम्ही ग्राम संघाची मीटिंग बोलावली आणि संगळ्यांसमोर हा विषय मांडला. या वर सखोल चर्चा झाली आणि महिलांना तो आवडला. पुढच पाऊल म्हणजे आम्ही सगळ्या बचत गटाची मीटिंग घेऊन संगल्याना समजावल आणि त्यांची समत्ती घेतली.
आता पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्न होता. एक पाटी तयार कारायला किती खर्च येईल त्याची चौकशी करून आम्ही ठरवलं की प्रत्येक महिला १०० रुपये काढेल आणि तस करून आम्ही एकवीस हजार रुपये गोळा केले. हा मोठा प्रश्न सुटला होता. आता सगळ्या गटातल्या महिलांची नाव घेऊन अन त्यांची पद लिहून आम्ही पाट्या बनवायला दिल्या. दहा दिवसात पाट्या तयार होऊन आल्या आणि आमच्या गावचे सरपंच हे इलेक्ट्रिक फिटिंग च काम करतात म्हणून आम्ही त्यांनाच सांगून ह्या पाट्या लावून घेतल्या. त्यांना सुद्धा ही संकल्पना आवडली.

सर्वांच्या दाराबाहेर सात मार्च ला पाट्या लावून झालेल्या आणि महिलांनी या वर्षीचा जागतिक महिला दीन अश्या वेगळ्या प्रकारे साजरा केला.
तुम्हाला वाटेल की पाट्या लावल्यावर काय बदल झाला असेल? तर महिलांचा आत्मविश्वास वाढला. पहिली गोष्ट पाट्या लावताना त्यांच्या नवऱ्याने विरोध केला नाही, आपल्या दाराबाहेर नवऱ्याच्या नावाची पाटी नाही पण आपली लागली ह्याचा त्यांना गर्व वाटू लागला आणि हे घर माझं आहे हे ते हक्काने बोलू लागल्या. इतकचं नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाचा जो प्रश्न होता तो मिटला आणि महिलांची ओळख त्यांच्या बचत गटामुळे झाली.
२१० घरात पाट्या लागल्यामुळे बहुतेक सगळ्या दारात एकाच रंगाच्या पाट्या दिसू लागल्या. आता ह्याचा परिणाम असा झाला की ज्या महिला बचत गटात नाही त्यांना आपण कुठे तरी माघे राहिलो आहोत अस वाटू लागलं आणि एका आठवड्यात वीस महिला एकत्र आल्या आणि दोन नवीन बचत गट तयार करण्यात आले.
असं म्हणतात की एकदा ओळख निर्माण झाली की त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो जोमाने आपल्या कामाला लागतो आणि मग पुन्हा कधीही मागे वळून पाहत नाही.
