गेल्या महिन्यात मार्च मध्ये JSW फाऊंडेशन फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत ट्रॅव्हल वर्कशोप चे आयोजन भुज या शहरात करण्यात आलेले. भुज हे शहर गुजरात राज्यातील कच्छ या जिल्ह्यात येते. कच्छ हा जिल्हा बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे जसे भारतातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो, भारत देशाच्या नक्षामध्ये सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा, त्याच्या एका बाजूला भारत पकिस्तान सीमा लागून आहे तर दुसऱ्या बाजूला भल मोठा अरबी समुद्र आहे. कच्छ जिल्ह्याच्या इतिहास सुद्धा वाचण्यासारखं आहे. पण आपल्याला कच्छ आठवतो ते म्हणजे २००१ साली तिथे झालेला भूकंप. यावर चित्रपट ही तयार झाला आहे. भूकंपानंतर या शहराचं पुनर्वसन कसं झालं, कोणकोणत्या सौंस्थानी हे शहर उभ करण्यासाठी प्रयत्न केले आणि आज ते शहर इतर शहरांच्या तुलनेत कुठे आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो.
मी नागपूर हून निघालो होतो आणि ३० तास प्रवास केल्या नंतर मी भुज ला पोचलो. आमच्या सर्वांची राहण्याची व्यवस्था खमिर या सौंस्थे मध्ये केलेली. खमिर ह्या सौंस्थेचे आर्किटेक्चर हे अविस्मरणीय आहे. त्याची एक एक इमारत त्यांनी विचार पूर्वक तयार केलेली आहे इतकचं नव्हे तर पुन्हा भूकंप आला तरी त्याला काहीही होणार नाही ह्याची देखील काळजी घेतलेली आहे. खमिर ही सौंस्था कच्छ या भागातल्या कला आणि कौशल्य जपण्याच काम करत आहे. चारक्यापासून धागा बनवण्यापर्यंत ते हॅण्डलूम कपडे आणि साडी बनवण्यापर्यंत, वेगवेगळ्या प्रकारची मातीच्या भांडी, घंटा इत्यादी गोष्टी वरती काम करत आहे.
आम्ही अनेक सौंस्थाना भेटलो आणि त्यांच काम समजून घेतलं. त्यात एक संस्था ती म्हणजे “कच्छ महिला विकास संगठन” जी महिला शशक्तिकरण या विषयावर काम करत आहे, “हूनर्षाला” ही संस्था लोकांना घर बनवून देण्याच काम करत आहे, “सेतू अभियान” ही संस्था पंचायत राज या विषयावर त्यांच काम कच्छ जिल्ह्याच्या बऱ्याच ग्राम पंचायत सोबत चालू आहे आणि गाव आदर्श कसे होऊ शकते हे त्यांचे प्रयत्न आहेत. आम्ही ह्या सगळ्या संस्थांना भुज शहरात भेटलो.
एके दिवशी आम्हाला दुसऱ्या संस्थेला भेटायचं होतं आणि तिथेच मुक्काम होता. आम्ही सकाळी खमिर हून निघालो. ११० की.लो.मिटर चा प्रवास करून आम्ही दोन तासात तिथे पोचलो. संस्थेच नाव ग्रामीण स्वराज संघ. ही संस्था कच्छ जिल्ह्यातील रापर तालुक्यात होती. १९७८ साली मनिभाई संघवी यांनी त्याची स्थापना केली होती. संस्थेमध्ये शिरताना एक वेगळेपण वाटतं होतं. इतकी मोठी जागा, एका बाजूला ग्राउंड, दुसऱ्या बाजूला शाळा आणि त्यात वर्गांचे आकार सुद्धा वेगळे, इतकचं नव्हे तर सगळीकडे पसरलेली फुलांच्या बागा आणि सगळी कडे शांतता आणि शांतता.

आम्ही ज्या खोलीमध्ये राहत होतो त्यात स्वामी विवेकानंद, परमहंस आणि गांधीजींचा फोटो होता. जुन्या काळातल्या खोल्या असतात तशी ती होती. आता मला भास व्हायला लागला होता की इथे गांधीजींचा काहीतरी संबंध असेल. तिथल्या चिमुकल्या मुलांनी आम्हाला सकाळी नाष्टा दिला आणि आणि अख्खा दिवस आमचा पाहुणचार देखील केला. आमच पाहिलं सत्र दिनेश भाई यांचा सोबत होतं. दिनेश भाई आणि त्यांचे भाऊ रमेश भाई हे दोघं मिळून ही ती संस्था चालवत होते.
दिनेश भाई नी स्वतःचा परिचय देत संस्थेचा परिचय करून दिला आणि संस्था काय काय काम करत आहे हे त्यांनी बारकाईने सांगितले. इतकचं नव्हे तर गांधीजी कोण होते , त्यांचे विचार, त्यांचं समाजासाठी च योगदान आणि त्यांचे विचार आज आमची संस्था कशी पुढे घेऊन जात आहे हे त्यांनी सांगितलं. हे सगळं ऐकल्यावर आणि दिनेश भाई सोबत चर्चा केल्यावर मला जणू काही त्यांचात गांधीजीचा भास झाला कारण त्यांची बोलण्याची पद्धत, राहणीमान हुबेहूब मी वाचलेल्या गांधीजी सारखी होते. दिनेश भाई च सत्र झाल्यावर माझ्या मनातली शंका दुर झाली होती आणि संस्थेच्या परिसराकडे बघून, गांधीजी नी मांडलेल्या ग्रामीण विषयावरचे पाठ मला दिसू लागले.
दुपारी तिथे राहणाऱ्या एका कॉलेज प्रोफेसर ने आम्हाला पूर्ण संस्था दाखवली. तुम्ही आश्चर्य व्हाल पण त्या संस्थेच्या आवारात गौशाळा होती, मुलांनी लावलेला भाजी पाला आणि पुलंची बाग, मुलांसाठी स्विमिंगपूल, खेळायला मोठ ग्राउंड, मुलांची शाळा, हॉस्टेल, मुलांना खाण्यासाठी वेगळी खोली इत्यादी होते. इथे गोरगरिबांची आणि आदिवासी मुलं शिकायला येतात. त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि शिक्षणाची सोय संस्था करते. मुलं आणि शिक्षक एकाच परिसरात राहतात जेणेकरून शिक्षणाचं लक्ष मुलांवर कायम राहतं. मुलांना शिक्षणामध्ये तर उत्तीर्ण होतात पण त्या ही बरोबर त्यांच्यातले कला कौशल्यानवर सुद्धा लक्ष दिलं जातं. आणि सगळं करत असताना यात मुलांचा सहभाग १०० टक्के असतो.

ही संस्था शिक्षण या विषयावाबरोबर आरोग्य, पर्यावरण आणि स्तलांतरित लोकांसाठी काम करते. संध्याकाळी आम्ही तिथल्या एका वस्ती मध्ये गेलेलो जिथे या संस्थेच काम चालतं. तिथे त्यांना घर बांधून दिल आहे, उपजिविकेसाठी त्यांना शिवण काम शिकवल जातं आणि आरोग्य साठी त्यांच्या तपासण्या ही होतात.
हे सगळं आटपून आम्ही पुन्हा संस्थे मध्ये आलो आणि तेव्हा साधारण सात वाजेलेले आणि अमहला सांगितलं गेलं की “तुमचं जेवण तयार आहे, कृपया लवकर जेवून घ्या”.
माझ्या डोक्यात विचार आला की इतक्या लवकर कस जेवायचं आणि शाळेतल्या मुलांचं काय, ते जेवलित का? हा प्रश्न मी त्या संस्थेच्या एका व्यक्तीला विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की, मुलांचं सहा वाजता जेवून झाल आहे आणि आता थोड्या वेळेत ते झोपायला पण जातील. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या डोक्यात कुठे तरी साठत होत्या. आम्ही सगळे जेवलो आणि संस्थेच्या परिसरात फिरत होतो. शांतता अशी की जणू काही मी कुठे डोंगरावर येऊन बसल्या सारखं वाटतं होतं. दुपारी जिथे मुलांचा कल्लोळ होता आता तिथे एक चिट पाखरू ही दिसत नव्हतं.
रात्री झाली आणि मी झोपायला गेलो. अख्खा दिवस अनुभवलेल्या गोष्टी डोक्यात कुठे तरी चालू होत्या आणि झोपी गेलो. सकाळी मी साडेचार ला उठलो आणि घराच्या बाहेर येऊन उभा राहिलो आणि बघतो तर काय, जिथे तिथे मुलं काम करत होती, सगळी कडे काळोख, शांतता पण मात्र या मुलांचे हात अन पाय चालू होते, कोण झाडू मारत होतं, तर कोण झाडांना पाणी घालत होत, बरीच मुलं ग्राउंडवर साफ सफाई करत होती. जणू काही मुलांची फौज कामाला लागलेली अस वाटत होतं. ते चित्र माझ्या डोळ्या समोरून अजूनही जात नाही. सकाळी आम्ही सर्व जणांनी नाष्टा करून आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो.
तिथे एक दिवस राहून मला बरच काही शिकायला मिळालं. गांधीजी अजून जिवंत आहे असं वाटायला लागलं कारण त्यांचे विचार, त्यांनी दिलेले धडे अजूनही जोपासले जात आहेत. असं म्हटलं जात की लहानपणी मुलांना दिलेले संस्कार आणि सगळ्या गोष्टींची करून दिलेली जाणीव त्याला सक्षम बनवते, एक चांगला माणूस म्हणून घडवते, आयुष्यात योग्य ते निर्णय घ्यायला आणि आयुष्य कसं जगायचं हे शिकवते.
खरंच दिनेश भाई आणि रमेश भाई नी हाती घेतलेले हे काम आणि ग्रामीण स्वराज्य सस्थांमार्फत गांधीजींच्या विचारांवर चालू असलेल्या या कार्याला माझा सलाम.
