एके दिवशी संध्याकाळी मी माझ्या घरा जवळच्या बागेत बसलेलो. तिथे लहान मुलं गप्पा मारत बसलेली. आजकाल ची मुलं म्हटलं की त्यांच्या कडे इन्स्टाग्राम वरच्या रीलस्, फेसबुक वरची नवीन पोस्ट किंवा मोबाइल मध्ये नवीन गेम या शिवाय त्यांचे कडे दुसरे विषय बहुतेक नसतात.
पण ह्या मुलांमध्ये कसली वेगळीच चर्चा चालु होती. त्यात दोन मुलं आणि तीन मुली होत्या. त्यांच्या वयात अंतर जाणवत होतं. ही मुलं काय चर्चा करत आहेत ह्या उसुक्तेने मी विचार केला चला आपण पण ह्यांच्या गप्पा मध्ये सहभाग घेऊया. त्यात एक होता राहुल जो नव्वीत होता, दुसरा होता आशिष जो आठवीत, तिसरी होती प्रणाली जी यंदाच्या दाहावीच्या परीक्षेमध्ये पास झाली होती, चौथी होती रेशमा जी बारावी पास झालेली आणि पाचवी होती रंजना जी सातवीत होती. मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही काय गप्पा मारत होतात. त्यावर राहुल म्हणाला की आम्हाला कोणत्या शेत्रात करिअर करायचं आहे त्या बद्दल बोलत होतो. हे ऐकून मला थोडा धक्का बसला कारण मुलानं मधल्या अश्या गप्पा फार दुर्मिळ झाल्या आहेत. उत्सुकता म्हणून मी त्यांना विचारलं की पुढे जाऊन तुम्हाला काय बनायचं आहे ? त्यावर राहुल म्हणाला की मला आई.आई.टी बॉम्बे मधून इंजिनियरिंग करायचं आहे, आशिष म्हणाला की मी आर्किटेक्ट होणार, प्रणाली म्हणाली की मला समजत नव्हतं की कोणतं शेत्र निवडायच म्हणुन मी करिअर गायदन्स घेतलं आणि मग ठरवलं की कॉमर्स घ्यायचं आणि सी.ए. करायचं, रेशमा म्हणाली की मी सायन्स घेतलं होतं पण मला जमलं नाही म्हणून मी सुद्धा करिअर गायदन्स घेतलं आणि ठरवलं की वकील बनवायच, आणि शेवटची मुलगी रंजना म्हणाली की मला अजून ठाऊक नाहीय की मला काय बनायचं आहे, पण मी सायन्स घेईन, डॉक्टर किंवा इंजिनिअर ही दहावी झाल्यावर ठरवू. मी मुलाचं सगळं ऐकलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि तिथून निघालो. हा सांगितलेला प्रसंग मुंबईत घडला होता आणि त्याला एक वर्ष होऊन गेलेलं.
आम्ही २८ फेब्रुवारी २०२३ ला ग्राम पंचायत लिंगा मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला होता आणि त्या सोबत गावातील यंदा १० वी ची परीक्षा देणाऱ्या मुलांना ग्राम पंचायत तर्फे शुभेच्छा देणारा कार्यक्रम आजोजीत केला होता. ह्या कार्यक्रमात ग्राम पंचायत ने संकल्प केला होता की गावातील मुलं ही आपलीच आहेत आणि आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत. यावर माझा आधीचा लेख “All The Best” म्हणुन लिहीला आहे. तुम्ही वाचला नसेल तर नक्की वाचा, तुम्हाला याचा संदर्भ नक्की कळेल.
ह्या कार्यक्रमाला होऊन तीन महिने झाले होते आणि दहावी आणि बारावी चे निकाल जाहीर होणार होते. तेव्हा कोण जाणे माझ्या डोक्यात त्या बागेत बसलेली मुलं आठवली आणि त्यांच्या त्या गप्पा. ग्रामीण भागात राहुन आणि मुलांशी संवाद साधुन मला इतकं कळालं होतं की त्यांना दहावी आणि बारावी नंतर कोण कोणती शेत्र असतात जी आपल्या आवडीची आहेत ही माहित नसतं. त्यांना फक्त पोलिस आणि आर्मी भरती मध्ये जाऊ शकतो, आई.टी.आई करू शकतो किंवा डॉक्टर आणि इंजिनिअर बनू शकतो इतकचं माहित असतं.
इथे जन्म झाला प्रोजेक्ट संकल्प चा. मी ग्राम पंचायत मध्ये विषय मांडला की आपल्या दहावीच्या मुलांना आपण फेब्रुवारी मध्ये शुभेच्छा दिल्या. आता दहावी आणि बारावीचा निकाल लागेल. आणि पुढे काय करायचं हे त्यांच्या डोक्यात असेल पण गावात बऱ्याच मुलांशी बोलल्यावर मला समजलंय की त्यांना ठाऊक नसतं की कोणतं शेत्र निवडाव. बहुतेक मुलं अपला मित्र किंवा मैत्रीण काय घेत आहे ते बघून स्वतः सुद्धा त्या शेत्रात उदी मरतात, किंवा आपल्या मरकांवर ठरावात. मी प्रस्ताव मांडला की आपण पास झालेल्या मुलांचा सत्कार करूया आणि त्यांच्या साठी करिअर गायदान्स सेशन ठेवूया. ग्राम पंचायत बॉडी साठी हे नवीन होतं पण त्यांनी पाठींबा दिला आणि खास करून ग्राम पांचायतच्या सरपंच पल्लवी हत्ती ह्यांनी भरपूर मदत केली.

आम्ही ठरवलं की गावातली मुलं जी शिकून चांगल्या पदावर आहेत ही तरुण मंडळी मुलांना मार्गदर्शन देईल. आम्ही दहावी च्या सगळ्या बॅच ची यादी काढली आणि फोन करायला सूर्वात केली. असं करत करत आम्ही पाच नाव ठरवली. त्या पैकी एक सिव्हिल इंजिनियर होता, एक फॉरेस्ट गार्ड, एक शाळेत शिक्षिका होत्या.
मुलांच्या परीक्षेचे निकाल जाहीर झालेले. एक तारीख ठरवण्यात आली. त्या दिवशी दहावी आणि बारावी मधली पास झालेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला आणि वेगवेगळ्या शेत्रातल्या तरुण मंडळी कडून मार्गदर्शन ही देण्यात आले. ग्राम पंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मुलांना पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मुलांचे पालक आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

मुलांनी संकल्प केला की त्यांच्या आवडत्या शेत्रात ते अर्ज करतील आणि शिक्षण घेतील तसच ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला की दर वर्षी हा कार्यक्रम आपल्या मुलांसाठी राबवतील.
