Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

नागपुर – महाराष्ट्राची उपराजधानी

नागपूर हे एक ऐतिहासिक शहर आहे. तिला महाराष्ट्रची दुसरी राजधानी म्हटलं जातं. मुंबई पासून एक साधारण ८०० कि. मी. आणि १८ तासाचा प्रवास आहे. तसं बघायला गेलं तर मुंबई आणि नागपूर हे महाराष्ट्राचे दोन टोकचं आहेत. एक समुद्राच्या अगदी जवळ तर तर दुसऱ्याला समुद्र म्हणजे काय ह्याचं थाहुक नाही. चला मग जाणून घेऊया या नागपूर शहारा बद्दल.

ऐतिहासिक महत्त्व:

नागपूर हे महाराष्ट्रात तिसरं मोठं शहर मानलं जातं. नागपूरला भारत देशाचं केंद्र बिंदु ही म्हटलं जातं. मेगालिथिक संस्कृती जी आपल्याला इतिहासाच्या पुस्तक माहिती आहे ती इथे सापडली जाते, तसच ३००० सालापासून लोक इथे राहत आहेत . ह्या शहराची स्थापना गोंड राजाने केली पण नंतर ती मराठा साम्राज्याच्या अंतर्गात आली. मग भोसले इथे राज्य करू लागले.

१९ साव्या शतकात ब्रिटिशांनी नागपूर आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याला सेंट्रल प्रांत आणि बेरारची राजधानी बनवली. नंतर भारतच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये १९२० साली काँग्रेस सेशन नागपूर मध्ये झाले आणि नॉन कोपरेशन चळवळीचा ठराव पास झाला.

तसं नागपूरचा इतिहास खूप मोठा आहे. चला आता पाहुया त्याचा भौगोलिक इतिहास.

भौगोलिक इतिहास:

नागपूर हे भारत देशाचं केंद्र बिंदू आहे कारण त्याला सेंटर ऑफ इंडिया असं ही म्हटलं जातं. ब्रिटिशांनी झीरो माईलची स्थापना केली जिथून ते देशातील मोठमोठ्या शहराचे अंतर मापायचे.

आता नागपूर नाव कसं पडलं ह्याचा सुद्धा निसर्गाशी जोडणारा किस्सा आहे. नागपूर मध्ये नाग नदी ही शहराच्या एका बाजूने वाहते आणि ती सापाच्या अकरासारखी वाहते म्हणून नाग आणि पूर म्हणजे शहर, म्हणून नागपूर असं नाव ह्या शहराला पडलं.

नागपूरला टायगरची राजधानी सुद्धा म्हटलं जातं कारण, इथे सर्वात जास्त टायगर रिझर्व्ह आहेत. तसच हे शहर मध्य प्रदेश राज्यापासून अगदी जवळ आहे म्हणून इथे मराठी आणि तितकच हिंदी भाषा बोलली जाते.

नागपूरला संत्राच शहर सुद्धा म्हटलं जातं कारण देशात सर्वात जास्त संत्रा नागपूर मध्ये तयार होतात. इथली संत्रा बर्फी सुद्धा जगभर प्रसिद्ध आहे. संत्र्या बरोबर कापूस सुद्धा खूप लावला जातो. नागपूर मध्ये जेवण्याची एक वेगळी चव आहे त्याला सावजी किंवा वर्हाडी असं म्हटलं जातं.

ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पण नागपूर म्हटलं आणि त्यात मे महिना म्हटला तर लोकांना एकच आठवतं ते म्हणजे इथलं तापमान. आणि हो ते अगदी योग्य आहे. चला मग, तुम्हाला मी माझे थोडे किस्से ही सांगतो.

मी आहे मुळ मुंबईचा म्हणून समुद्रा जवळ राहण्याची सवय होती. तसच मुंबईला इतकं तापमान नसतं की दुपारी लोक बाहेर पडू शकतं नाही आणि थंडी ही इतकी नसते. पण पहिल्यांदा मी गेल्या वर्षी नागपूरला आलो. डिसेंबर महिन्यात थंडीचा अनुभव घेतला आणि तो छान होता. तेव्हा मला माझी मित्र मंडळी म्हणाली होती की मे महिन्याची गर्मी सुद्धा तुला बघायची आहे.

आता मे महिना चालू आहे आणि जसं लोकांनी म्हटलं होतं की इथलं तापमान जास्त असतं ते बरोबर आहे. मी तर म्हणेन की ते मुंबई पेक्षा जास्तच आहे.

तर या तापमानामुळे होणारे बदल मी बघतीले आणि ते काय तर –

– शाळेचे तास तसच अंगणवाडीचे तास बदलतात. ते लवकर सुरू होतात आणि लवकर संपतात.

– शेतकरी दुपारी शेतात जास्त काम करत नाही किंवा कमी काम करतात.

– नोकरीला जाणारा माणूस हा सकाळी एक तास आधीच निघतो आणि ऑफिस मध्ये जाऊन बसतो.

– इतकं तापमान असतं की लग्नाचे मूर्त सुद्धा रात्रीचे असतात आणि लग्नं कार्य रात्री पार पडतं.

– दुपारची दुकानं बंद राहतात आणि रस्त्यावर तुम्हाला फुलपाखरू सुद्धा दिसत नाही.

– तोंडावर गमचा लावल्या शिवाय आणि कांदा किशात ठेवल्या शिवाय कोणी बाहेर पडत नाही.

– इतकचं काय तर दुपारी तुम्ही नळाचे पाणी हातावर घेऊ शकत नाही, अंघोळ तर दुरच राहिली.

अजून मे महिना संपला नाहीय आणि वेगवेगळ्या गोष्टी मी अनुभवत आहे. लोक म्हणतात की असं वातावरण जुन महिन्यात सुद्धा राहील. आता मात्र या तापमानाची भिती तर गेली मग त्याचे फैदे काय होऊ शकतात त्याचा शोधात आहे.

असं आहे हे माझं नागपूर शहर – ऐतिहासिक आणि सगळ्या दृष्टीने वेगळं.

Leave a comment